एकलहरे वीज केंद्रप्रश्नी संचालकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:18 AM2018-09-19T00:18:11+5:302018-09-19T00:18:34+5:30
जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन केली.
एकलहरे : जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन केली.
एकलहरे वीज केंद्राबाबत होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने श्रीमाळी यांची भेट घेऊन, जोवर नवीन संच होत नाही तोवर जुने संच बंद करू नये, तसेच या संचांचे आयुर्मान वाढण्यासाठी संचांचे रिन्यूवेशन अॅण्ड मॉडिफिकेशन करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी प्रकल्प बचाव संघर्ष समिती अध्यक्ष शंकरराव धनवटे, अनिल जगताप, विशाल संगमनेरे, बाळासाहेब म्हस्के, निवृत्ती चाफळकर, सचिन जगताप, सुरेश सरदार, सुभाष जगताप आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमाळी यांनी, कोराडी येथील संच ६ चे केलेले आर अॅन्ड एमचे काम फेल झाले असून, एकलहरे येथील संचाचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाबाबत उकईच्या धर्तीवर अभ्यास सुरू आहे. त्याबाबत येत्या दोन महिन्यांत ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले.