दिव्यांगांच्या मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:06 PM2020-04-16T18:06:57+5:302020-04-16T18:07:42+5:30
लॉकडाउनमुळे दिव्यांगांना अडचणींंचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवावी, अशा आशयाचे निवेदन निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
वनसगांव : लॉकडाउनमुळे दिव्यांगांना अडचणींंचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवावी, अशा आशयाचे निवेदन निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निफाड तालुक्यातील अनेक दिव्यांगांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना अन्न धान्य मिळत नाही. त्यामूळे अडचणीत वाढ झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे तालुक्यातील दिव्यांगांना मोफत रेशन मिळावे यासाठी तहसीलदार पाटील यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना तत्काळ जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझर, मास्क व औषधे लवकर मिळावीत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे
तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धुमाळ, निफाड शहराध्यक्ष विकास खडताळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव, सरचिटणीस विलास भालेराव आदी उपस्थित होते.