‘सीटू’च्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:43 PM2018-12-01T17:43:56+5:302018-12-01T17:44:09+5:30

सिन्नर : देशभरातील २२३ शेतकरी संघटनांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संसद भवनाला घालेल्या घेरावाला पाठिंबा देण्यासाठी ‘सीटू’ च्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Request for tahsildars of various demands on behalf of 'CITU' | ‘सीटू’च्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

‘सीटू’च्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

Next

सिन्नर : देशभरातील २२३ शेतकरी संघटनांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संसद भवनाला घालेल्या घेरावाला पाठिंबा देण्यासाठी ‘सीटू’ च्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.
जगाचा पोशिंदा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अन्याय, हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. यापूर्वीही विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई पायी मोर्चाने जावून मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र शेतकºयांच्या प्रत्यक्षात हाती काहीच पडले नसून मुख्यमंत्र्यांनी शेतक्रयांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी एकत्रिपणे येवून संसदेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस चालेल्या या घेराव आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शेतीमालाला उत्पादीत खर्चावर दीडपट भाव द्या, शेतकºयांची खासगी व सरकारी सर्व कर्जे माफ करा, जनावरांसाठी चारा व पिण्याची व्यवस्था करा, कसणाºयांच्या नावे फॉरेस्ट प्लॉट कराव सातबारा उतारा द्या, केटा फार्म कारखान्यातील पगाराची वाढ करा व त्यांच्यावरीाल खोटे गुन्हे मागे घ्या, ६० वर्षे वय असलेल्या शेतकºयांना ६ हजार रूपये पेन्शन द्या, जनम बायोटेक कंपनीतील कामगारांना कामावर घ्या आदी मागण्यांचे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी सीटूचे हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, अशोक भांबर, दत्तात्रय रसाळ, अविनाश उपासनी, अमोल जाधव, सुभाष कुºहे, संदीप कारे, संदीप मोरे यांच्यासह कामगार उपस्थित होते.

 

Web Title: Request for tahsildars of various demands on behalf of 'CITU'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप