पेस्ट कंट्रोलसाठी निविदा काढण्याचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:05 AM2019-08-03T01:05:59+5:302019-08-03T01:07:00+5:30

पेस्ट कंट्रोलसाठी नवा ठेका काढण्यासाठीचा ठराव महासभेत होऊनही तो दडवून ठेवल्याने आता सध्याच्याच ठेकेदाराला काम देण्यासाठी घाटत असतानाच महापौर भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटून तातडीने अल्प मुदतीच्या निविदा काढण्याची मागणी केली आहे.

Request for Tender Removal for Pest Control | पेस्ट कंट्रोलसाठी निविदा काढण्याचा आग्रह

पेस्ट कंट्रोलसाठी निविदा काढण्याचा आग्रह

Next

नाशिक : पेस्ट कंट्रोलसाठी नवा ठेका काढण्यासाठीचा ठराव महासभेत होऊनही तो दडवून ठेवल्याने आता सध्याच्याच ठेकेदाराला काम देण्यासाठी घाटत असतानाच महापौर भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटून तातडीने अल्प मुदतीच्या निविदा काढण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या पेस्ट कंट्रोलचा ठेका येत्या दि. ९ आॅगस्ट रोजी संपणार आहे. साडेसतरा कोटी रुपयांचा हा ठेका वादग्रस्त ठरला होता तसेच तो रद्द करण्याची वेळावेळी मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने नवा ठेकेदार नियुक्त करण्यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार दि. २५ जून रोजी महासभेत नवीन ठेक्यासाठी ३७ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चासाठी मान्यता देण्यात आली. परंतु महापौर कार्यालयात हा ठराव दडपून ठेवण्यात आल्याने प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही. आता पंधरा दिवसांपूर्वी हा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मात्र हा ठराव प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षांसाठीचा ठेका देण्यासाठी घाईघाईने कारवाई करता येणार नाही.





त्याच स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने डोके वर काढल्याने सध्याच्या ठेकेदारालाच मुदतवाढ देण्याचे घाटत आहे.
महापौर रंजना भानसी आणि गटनेता जगदीश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली आणि त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्याऐवजी तातडीने अल्प मुदतीच्या निविदा मागवून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
इन्फो..
तो सदस्य कोण?
महासभेत पेस्ट कंट्रोलच्या नव्या निविदा काढण्याचा ठराव केला जात असताना एका नगरसेवकाने मात्र निविदा न मागताच कामे करावीत, असा आग्रह धरला असून तसे पत्रच महासभेच्या वेळी सादर केले आहे. सध्याच्या ठेकेदारावर एवढी मेहेरबानी का? असादेखील प्रश्न केला जात आहे.

Web Title: Request for Tender Removal for Pest Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.