राज्यराणी नांदेडपर्यंत नेल्याप्रकरणी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:06 AM2019-12-23T00:06:32+5:302019-12-23T00:18:22+5:30
नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
नाशिकरोड : नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने सेंट्रल रेल्वेचे प्रवासी वाहतूक मुख्य व्यवस्थापक धनंजय नाईक व मनदीप सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेल्यास नाशिकच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसवर मोठा ताण पडेल. त्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेस ही मनमाड-मुंबई अशीच ठेवण्यात यावी. नांदेड-मुंबईकरिता स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नाईक व सिंग यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयात सकारात्मक प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संजय शिंदे, रतन गाढवे, मयूर यादव, कृष्णा कारवा, गुलाब गवारी, महाजन, आनंद फलके, महिंद्रा जाधव, जितेंद्र वंजारी आदी उपस्थित होते.