विविध मागण्यांसाठी युवासेनेचे एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:01 PM2019-01-03T18:01:14+5:302019-01-03T18:37:23+5:30
ओझर : निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्यांसंदर्भात विभागीय नियंत्रक नितीन मैन्ड यांना करून व निवेदन देऊन या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. निफाड तालुका युवा सेनेने केलेल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ निफाड आयटीआयला नाशिक ते येवला या बसला थांबा द्यावा. अंतरवेली तालुका निफाड या गावातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व विद्यार्थिनी पिंपळगाव बसवंत येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात या विद्यार्थ्यांना येण्यासाठी वनी पिंपळगाव या बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे, तरी सकाळी सात वाजता अंतरवेली गावातून पिंपळगाव बसवंत येथे जाण्यासाठी स्वतंत्र बस फेरा सुरु करावा.

चांदोरीमार्गे जाणाऱ्या नाशिक लासलगाव व लासलगाव नाशिक या काही बसेस चांदोरी बस स्टॉप वर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना चांदोरी येथे येण्यास फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. व सायंकाळी घरी जाण्यासाठी देखील भरपूर वेळ चांदोरी बसस्टॉपवर ताटकळत उभं राहावं लागत या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा विचार करून या सर्व बसेसला सक्तीने चांदोरी बस स्टॉपवर उभे राहण्यास आदेश द्यावे.
प्रतिक्रि या-
निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे बस थांबा देण्याचे आदेश दिले आहे. अंतरवेली तेपिंपळगाव या बसचा सर्वे करून लवकरच अंतरवेली ते पिंपळगाव या स्वतंत्र बसचा फेरा सकाळी ७ वाजता सुरू करण्यात येईल. चांदोरी येथील बस थांब्याचा प्रश्न लक्षात घेता चांदोरी येथून जाणाºया सर्व लाल बसेस बसला थांब्यांवर थांबण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
नितीन मैन्ड,
विभाग नियंत्रक
राज्य परिवहन महामंडळ
नाशिक.