जलद विकासासाठी अभियांत्रिकी दृष्टिकोन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:11 AM2017-09-16T00:11:25+5:302017-09-16T00:11:42+5:30
: भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
नाशिक : भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. उंटवाडी परिसरातील दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिंवसरा, सहसचिव विपुल मेहता, अजित पाटील उपस्थित होते. हेमंत गोडसे म्हणाले की, देशातील शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग- व्यवसाय व दळणवळण क्षेत्रात झपाट्याने विकास साधण्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात इस्त्रोच्या सहकार्यातून अशाप्र्रकारे योजना आखण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह संजय लोंढे, संतोष मुथा, नरेंद्र बिरार, महावीर चोपडा, विलास पाटील, पी. के. पवार, अपूर्वा जाखडी, नॉर्बर्ट डिसूझा, संजय देशपांडे, नयनीश जोशी आदी उपस्थित होते. मनीष कोठारी यांनी प्रास्तावित केले. अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुमित खिंवसरा यांनी आभार मानले.
सत्कारार्थी विद्यार्थी
इंजिनिअरिंगच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव येथील जीएच रायसोनी महाविद्यालयाच्या संजय महाजनसह नाशिक येथील गुरु गोविंदसिंगचा प्रणीत चौधरी, के. के वाघचा गोविंद भावसार, सोहम गायधनी, लोकनेते गोपीनाथ मुंडेतील शुभांगी भुसारे, मतोश्रीची शीतल कहांडळ व प्रतीक्षा देवकर, मेटची श्वेता धोंडगे व सोनाली भंडारे, केबीटीची चंचल जावळे, पुणे विद्यार्थिगृहाचा गणेश शेटे व शीतल बोरसे, शिरपूरच्या आर.सी पटेलमधील स्नेहा हंसवानी व दिव्या वानखेडे, संदीप इन्स्टिट्यूटची ऐश्वर्या बरड व चांदवडच्या के. बी. जैनमधील निखिता चव्हाण व नोहसिन कुरेशी, एसएसबीटीची गायत्री बडगुजर, जवाहर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्नेहल गुळवे या पदवीधर विद्यार्थ्यांसह के. के. वाघच्या एमई करणाºया मयूर जैन व रशिदा बादलीवाला या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.