रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:49 PM2019-08-04T15:49:51+5:302019-08-04T15:50:32+5:30

गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे.

Rescue: The first floors of the godowns on the Gangapur Road sank | रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले

रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले

Next
ठळक मुद्देजवानांनी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू केलेसोसायट्यांमध्ये पावसाळी नाल्यांचे पाणी शिरले

नाशिक : गोदावरीचा महापूराचा फटका गंगापूररोडवरील रहिवाशांच्या सोसायट्यांना बसला आहे. येथील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी वाढले आहे. त्यामुळे या भागातील इमारतींमध्ये अडकलेल्या रहिवाशांना रेस्क्यू केले जात आहे.
गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे.
निर्मला कॉन्वेंट हायस्कूलजवळील रामजानकी संकुलाचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथे महापालिका आपत्ती विभागाचे पथक मदतीसाठी पोहचले आहे. रबरी बोटीच्या सहाय्याने रहिवाशांना बुडालेल्या इमारतीच्या मजल्यावरून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. तसेच सरकारवाडा, सराफ बाजार परिसरातदेखील पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे या भागातही काही लोक अडकले होते. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू केले. गंगापूररोडवरील लक्ष्मी विला, अशोका योग, कमलक्षी, जोशी बाग या सर्व सोसायट्यांमध्ये पावसाळी नाल्यांचे पाणी शिरले आहे.

Web Title: Rescue: The first floors of the godowns on the Gangapur Road sank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.