कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 08:40 PM2019-07-23T20:40:09+5:302019-07-23T20:40:23+5:30

सटाणा : कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे अवैधरित्या वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. मंगळवारी (दि.२३) पहाटे लखमापूर-मालेगाव रस्त्यावरील नामपूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पाच जनावरांची सुटका करण्यात येवून पोलिसांनी चालकासह तिघांना अटक केली आहे.

Rescue of slaughtered animals | कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका

Next
ठळक मुद्देलखमापूर येथील प्रकार : चालकासह तिघांना केली अटक

सटाणा : कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे अवैधरित्या वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. मंगळवारी (दि.२३) पहाटे लखमापूर-मालेगाव रस्त्यावरील नामपूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पाच जनावरांची सुटका करण्यात येवून पोलिसांनी चालकासह तिघांना अटक केली आहे.
सटाणा येथून पाच जनावरे कोंबून पिकअप मालेगावकडे जात असल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक राहुल गवई यांना मिळाली होती. सटाणा-मालेगाव रस्त्यावरील लखमापूरनजीक गवई यांनी पोलीस हवालदार कदम, पोलिस नाईक शिसोद आदीे फौजफाट्यासह सापळा रचला होता.
पहाटे सटाणा मालेगाव मार्गाने जाणाºया वाहनांची तपासणीदरम्यान (एमएच ०६ बीजी २४४७) टेम्पो वाहनचालकाच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पिकअप टेम्पो थांबवून तपासणी केले असता त्यात पाच गोºहे कोंबून भरले असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पिकअप चालक इरफान सलीम शहा व त्याचे दोन साथीदार नविद शेख जमिल शेख, राशिद शेख गुलाम रसूल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rescue of slaughtered animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.