टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:38 PM2018-11-10T18:38:29+5:302018-11-10T18:39:20+5:30

एकशेवीस फुट उंचीच्या टॉवरवर अडकलेले वानर तब्बल २० तासांच्या कालावधी नंतर जमिनीवर उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिन्नर तालुक्यातील जायगावकरांनी अनुभवला ऐन दिवाळीत अनुभवला वानराचा थरार.

Rescue stuck on towers after 20 hours | टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका

टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका

Next

दत्ता दिघोळे । नायगाव : एकशेवीस फुट उंचीच्या टॉवरवर अडकलेले वानर तब्बल २० तासांच्या कालावधी नंतर जमिनीवर उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिन्नर तालुक्यातील जायगावकरांनी अनुभवला ऐन दिवाळीत अनुभवला वानराचा थरार.
जायगाव येथील पाटील वस्ती जवळील गोविंद रामभाऊ दिघोळे यांच्या शेतातील विजेच्या टॉवरवर गुरूवारी सकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी चढलेले वानर १२० फुटांवर अडकून पडले. दोन दिवस अन्न आणि पाण्यावाचून व्याकुळ झालेल्या वानराला प्रयत्न करूनही खाली उतरता येत नसल्यामुळे टॉवरच्या टोकावर अडकवून पडले होते.
ऐन दिवाळीच्या दिवसात ही घटना घडल्याने शुक्रवारी दिवसभर अडकलेल्या वानराला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तीव्र उन्हामुळे टॉवरचे लोखंड तापल्याने वानराची होणारी घालमेल, खाली येण्यासाठी होणारी तळमळ व अन्न पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या वानराची अवस्था बघुन उपस्थितीतांची मने हेलावून गेली. दरम्यान पोलीस पाटील भिकाजी गिते यांनी वनविभागाला तर दिघोळे यांनी वीज वितरण विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे, वनरक्षक पी. एल. डावरे, पोपट बिन्नर, वनपाल अनिल साळवे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. टॉवर उंच असल्याने व सुरू असलेल्या वीजप्रवाहमुळे वानरला खाली उतरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रमेश हुल्लारे, सोपान दिघोळे, रवींद्र दिघोळे, प्रविण दिघोळे, सचिन गामणे आदीनी टॉवरच्या आजूबाजूला फटाके, राँकेट वाजविले. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाने वानराने टोकावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होत असल्याने वानर टप्प्या- टप्याने खाली उतरू लागले.
अर्धा तासाच्या कालावधीनंतर वानर जमिनीवर उतरले. दोन दिवस अन्न -पाण्याविना अडकलेले वानर जमिनीवर येताच पाणी, शेंगदाणे व टोमाट्यांवर ताव मारून वानराने तेथून धुम ठोकली. वानर सुखरूप खाली उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Rescue stuck on towers after 20 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.