विद्यार्थिनीचा जीव वाचवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:48 AM2019-01-04T00:48:50+5:302019-01-04T00:49:57+5:30
घोटी : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ह्याचा प्रत्यय घोटी जवळील देवळे गावात आला. घोटी सिन्नर महामार्गावरील दारणा नदीवरील पुलावरून अंगावर वाहन येत असल्याचे भासल्याने विद्यार्थीनीने पाण्यात उडी घेतली. मात्र, दौंडत येथील तरूणाने सदर घटना पाहताच तात्काळ पाण्यात उडी घेऊन विद्यार्थिनीचा जीव वाचवला. जीवाची पर्वा न करता १०० फूट खोल पाण्यातून जीव वाचवणाऱ्या या तरूणाचा पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सत्कार केला.
अंगावर वाहन येईल या भीतीने पाण्यात तोल गेला असावा. मी दुचाकीवरून जात असतांना ते दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली. यामुळे अश्विनीचे प्राण वाचवल्याचे समाधान आहे.
- कोंडाजी शिंदे, तरु ण शेतकरी, दौंडत
घोटी : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ह्याचा प्रत्यय घोटी जवळील देवळे गावात आला. घोटी सिन्नर महामार्गावरील दारणा नदीवरील पुलावरून अंगावर वाहन येत असल्याचे भासल्याने विद्यार्थीनीने पाण्यात उडी घेतली. मात्र, दौंडत येथील तरूणाने सदर घटना पाहताच तात्काळ पाण्यात उडी घेऊन विद्यार्थिनीचा जीव वाचवला. जीवाची पर्वा न करता १०० फूट खोल पाण्यातून जीव वाचवणाऱ्या या तरूणाचा पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सत्कार केला.
घोटी सिन्नर महामार्गावरील देवळे गावाजवळ दारणा नदीवर पूल आहे. ह्या पुलावरून सकाळी देवळे येथील अश्विनी पंढरी तोकडे ही १६ वर्षीय विद्यार्थिनी पायी जात होती. यावेळी वाहतूक जास्त असल्याने पुलावरून ओव्हरटेक करणारे वाहन अंगावर येत पाण्यात बुडणाºया विद्यार्थिनीस वाचवलेअसल्याचे तिला जाणवले. जीव वाचवण्यासाठी अश्विनीने थेट पुलावरून शंभर फूट नदीत उडी घेतली. तिला पोहता येत नसल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली. याचवेळी ह्या रस्त्यावरून दौंडत येथील युवा शेतकरी कोंडाजी शिवराम शिंदे जात होते. त्यांनी सदर घटना पाहताच जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उडी घेतली. अश्विनी हिला सुखरूप बाहेर काढून त्यांनी तिला उपचारासाठी इतरांची मदत घेऊन रूग्णालयात दाखल केले. देवदूतासारखे धावून आलेले कोंडाजी शिंदे यांच्यामुळे विद्यार्थिनींचा प्राण वाचल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
घटनेची माहिती समजताच वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी महामार्गावर एकाच गर्दी केली. यामुळे काही काळ वाहतूक कोलमडली होती. माजी सभापती रघुनाथ तोकडे यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने अश्विनीस खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले.