संशोधन केंद्रामुळे ग्रामीण उद्योजकतेला साहाय्य शिवप्रताप सिंग : संदीप फाउण्डेशनमध्ये केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:45 AM2018-05-27T00:45:52+5:302018-05-27T00:45:52+5:30

सातपूर : संदीप फाउण्डेशन येथे सुरू करण्यात आलेल्या भाभा अणुसंशोधन संस्थेच्या संशोधन केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण उद्योजकतेला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होणार असल्याचा विश्वास संदीप फाउण्डेशनमध्ये उन्नत भारत अभियान २.० सेल व भाभा अणुसंशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप सिंग यांनी व्यक्त केला.

Research center helps in rural entrepreneurship: Shivpratap Singh inaugurated center in Sandeep Foundation | संशोधन केंद्रामुळे ग्रामीण उद्योजकतेला साहाय्य शिवप्रताप सिंग : संदीप फाउण्डेशनमध्ये केंद्राचे उद्घाटन

संशोधन केंद्रामुळे ग्रामीण उद्योजकतेला साहाय्य शिवप्रताप सिंग : संदीप फाउण्डेशनमध्ये केंद्राचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देपुणे विद्यापीठातील हे पहिले व एकमेव संशोधन केंद्र ७० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली

सातपूर : संदीप फाउण्डेशन येथे सुरू करण्यात आलेल्या भाभा अणुसंशोधन संस्थेच्या संशोधन केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण उद्योजकतेला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होणार असल्याचा विश्वास संदीप फाउण्डेशनमध्ये उन्नत भारत अभियान २.० सेल व भाभा अणुसंशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप सिंग यांनी व्यक्त केला. पुणे विद्यापीठातील हे पहिले व एकमेव संशोधन केंद्र ठरले आहे.
संदीप फाउण्डेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये ‘उन्नत भारत अभियान २.० सेल’ व भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन शिवप्रताप सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवप्रताप सिंग यांनी सांगितले की, गावांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन असावा. सध्या भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली आहे. जेथे शेती आणि संबंधित क्षेत्राचे एकूण कामकाजाच्या ५१ टक्के काम आहे, परंतु देशाच्या एकूण जीडीपीपैकी फक्त १७ टक्के आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा खंड पडला आहे.
आरोग्य, शिक्षण, उत्पन्न आणि पायाभूत सुविधा तसेच रोजगाराच्या संधीतील असमानता, मोठ्या प्रमाणावरील शहरी क्षेत्रातील स्थलांतरण, जगभरात सर्वत्र तीव्र आणि अधिक तीव्रतेने वाटणाऱ्या सतत विकासाच्या गरजा ही गावांच्या पर्यावरणपूरक विकासाची मागणी आणि स्थानिक पातळीवर योग्य रोजगाराच्या संधीची मागणी आहे. उन्नत भारत अभियान (यूबीए) या दिशेने एक अत्यंत आवश्यक आणि अत्यंत आव्हानात्मक उपक्रम आहे. उन्नत भारत अभियानाची संकल्पना ग्रामीण भारतातील विकास प्रक्रि येत बदल घडवून आणेल, असेही त्यांनी सांगितले.
संदीप फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थी तसेच परिसरातील सर्वांगीण विकासासाठी संदीप फाउण्डेशन नेहमीच कटिबद्ध असून, आगामी काळातही असेच विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे यांनी आभार मानले.

Web Title: Research center helps in rural entrepreneurship: Shivpratap Singh inaugurated center in Sandeep Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.