संशोधकांची शेतीच्या विकासाला मदत
By admin | Published: December 31, 2015 11:06 PM2015-12-31T23:06:07+5:302015-12-31T23:13:24+5:30
सिन्नर महाविद्यालय : चर्चासत्रात मान्यवरांचे मत
सिन्नर : शेतीच्या विकासासाठी विद्यार्थी, संशोधक, एनजीओ, बॅँका व सहकारी संस्था यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘शेती क्षेत्रात नवीन सुधारणांची गरज’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रात विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
सिन्नर येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक राकेशकुमार यांनी गरजाभिमुख कर्जपुरवठा, प्राधान्यक्षेत्र कर्जपुरवठा, शेती रोजगाराभिमुख विकास कर्जे याबाबत मार्गदर्शन केले. अरुण घोडेराव यांनी शेतीविषयक कर्जसुविधांची माहिती दिली. डॉ. श्रीकांत जाधव यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवरील दुष्परिणाम स्पष्ट केला. डॉ. डी. आर. बच्छाव यांनी शेतीतील अनेक समस्यांची चर्चा केली. डॉ. अमोल गायकवाड यांनी शेतीतील विविध समस्या व त्यावर उपाययोजना सुचविल्या. डॉ. आर. एस. चिंतामणी यांनी शेतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘प्रात्यक्षिक पातळीवर शेती सुधारणांची गरज असल्याचे मत डॉ. सुहास आव्हाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य टी. बी. खालकर, आर. व्ही. पवार, ए. एस. गुरुळे, डॉ. बी. डी. खेडकर, एन. सी. पवार, एस. एन. पगार, वाय. एल. भारस्कर, एस. के. दळवी आदि उपस्थित होते. मोहिनी गुरव व जयश्री बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संजय पगार यांनी आभार मानले. (वार्ताहर)