दिंडोरी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 10:07 PM2021-01-28T22:07:04+5:302021-01-29T00:47:06+5:30
दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली.
दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली.
सन १९९५ पासूनचा आरक्षणाचा विचार करता आरक्षण काढण्यात आले. १७ पैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाच जागा आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित दहा ठिकाणी सरपंचपद खुले असणार आहे. त्यात महिलांसाठीचे आरक्षण ३ फेब्रुवारीला होणार आहे.
उतरत्या लोकसंख्या क्रमानुसार व यापूर्वी आरक्षण नसलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण त्यानुसार निश्चित करण्यात आले. एक नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी अजय गवारे या बालकाचे हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात परमोरीची चिठ्ठी निघाली.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,उपसभापती अनिल देशमुख, जि.प. सदस्य भास्कर भगरे,अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव, ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे,बोपेगाव सरपंच वसंत कावळे,लोखंडेवाडी सरपंच संदीप उगले काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड जवळके उपसरपंच योगेश दवंगे,भाजप नेते योगेश बर्डे,विनायक शिंदे,अनंत पाटील आदींसह सर्व गावांतील नवनिर्वाचित सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
अनुसूचित क्षेत्रासह सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव आरक्षण ३ फेब्रुवारीला होणार आहे. आरक्षण सोडत होताच सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दिंडोरी सरपंचपद आरक्षण पुढीलप्रमाणे
अवनखेड : अनुसूचित जाती, मातेरेवाडी :अनुसूचित जमाती, म्हेळुस्के : नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिंदवड : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ओझरखेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग, सोनजांब : नागरिकांचा मागास प्रवर्ग, परमोरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग,
सर्वसाधारण : खेडगाव, बोपेगाव, वलखेड, पाडे, लोखंडेवाडी, लखमापूर, जवळके वणी, तळेगाव वणी, तिसगाव , आंबेवणी