आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत : लक्ष्मण ढोबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:42 AM2019-01-14T01:42:43+5:302019-01-14T01:43:09+5:30
सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षण असल्यामुळे विविध घटक आणि निकषांवर मिळणाऱ्या आरक्षणामुळे जातीजातींमधील अंतर कमी होत आहे. ही चांगली बाब असून, आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक : सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षण असल्यामुळे विविध घटक आणि निकषांवर मिळणाऱ्या आरक्षणामुळे जातीजातींमधील अंतर कमी होत आहे. ही चांगली बाब असून, आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक मतप्रवाह असले तरी आरक्षणामुळे समाजातील जातीजातींमधील अंतर कमी होणार असेल तर आरक्षणाचे समर्थन केले पाहिजे. अनुसूचित जातींमध्येदेखील आरक्षणाचा प्रवर्ग अबकड याप्रमाणे लागू करावा, असे ढोबळे यांनी यावेळी सांगितले. अशाप्रकारचा प्रवर्ग लागू करावा यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ५८ जातींच्या लाखो दलितांनी मागणी केलेली आहे. मेहरा, लोकूर समितीचा अहवाल केंद्रात प्रलंबित महाराष्टÑ शासनाने तत्काळ अहवालाबाबत केंद्राला शिफारस करावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
दलितांमधील अतिमागास वर्गाला न्याय देण्यासाठी सखल मातंग समाजाने मागणी केलेली आहे. या संदर्भात राज्यातील सर्व मोर्चाधारकांच्या वतीने शंभर कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. सर्व सामाजातील गरीब व अल्पभूधारकांना न्याय देण्यासाठी १० टक्के आरक्षण देण्यावर राष्टÑपतींनी स्वाक्षरी केलेली आहे.
साहित्य संमेलनातील वाद चुकीचे
सध्या सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनातील वाद हे दुर्भाग्यपूर्ण आहेत. साहित्य क्षेत्रात अशा प्रकारचे वाद होता कामा नये. एकीकडे कन्नड भाषोला ज्ञानपीठाचा दर्जा मिळत असताना मराठी साहित्य विश्वात मात्र वादच होणार असेल तर हे चुकीचेच असल्याचेही ढोबळे यावेळी म्हणाले.