खेडलेझुंगे, कोळगावचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 09:34 PM2020-02-12T21:34:26+5:302020-02-12T23:57:42+5:30
कोळगावसह खेडलेझुंगे ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण महसूल विभागातर्फेजाहीर करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
खेडलेझुंगे : कोळगावसह खेडलेझुंगे ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण महसूल विभागातर्फेजाहीर करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ग्रामपंचायतीच्या सभागृहांमध्ये प्रभागरचना व आरक्षणाबाबत आढावा बैठक पार पडली. खेडलेझुंगे व कोळगाव ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्यांदा निवडणूक होत आहे.
खेडलेझुंगे : प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे - प्रभाग क्र . १ - अनु. जमाती स्री १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री १, सर्वसाधारण पुरुष १. प्रभाग क्र .२ - अनु. जमाती स्री १, अनु. जमाती पुरुष १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री १. प्रभाग क्र . ३ - नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष १, सर्वसाधारण पुरूष १. प्रभाग क्र . ४ - सर्वसाधारण स्री १, सर्वसाधारण पुरु ष २. एकूण ११ जागांपैकी ६ महिलांसाठी राखीव ५ जागेवर पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे.
यावेळी मंडल अधिकारी विजय आहेर, तलाठी गजानन ढोके, ग्रामविकास अधिकारी सी. जे. जाधव, कृषी पर्यवेक्षक श्रीमती पी. एच. गायमुखे, ग्रामसेवक श्रीमती एम. एस. दाभाडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोळगाव : प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र . १ - अनु. जाती स्री १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री १, सर्वसाधारण पुरु ष १.
४प्रभाग क्र . २ - अनु.जमाती स्री/पुरु ष १, अनु.जमाती स्री १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री/ पुरु ष १. प्रभाग क्र . ३ - सर्वसाधारण स्री/पुरु ष १, सर्वसाधारण स्री २. एकूण जागा ९ पैकी ५ स्री, तर पुरु ष ४ असे आरक्षण जाहीर झाले आहे.