आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागेल : उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:13 AM2018-07-28T01:13:04+5:302018-07-28T01:13:20+5:30
सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.
नाशिक : सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. नाशिक येथील संदीप फाउण्डेशनमध्ये शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेले असताना ते शुक्रवारी (दि. २७) पत्रकारांशी बोलत होते. निकम म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याविषयी तत्काळ कोणताही निर्णय होणे शक्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेची आहे. दगडफेक व हिंसाचार कोणत्याही प्रश्नांचे उत्तर होऊ शकत नाही. हिंसाचारामुळे गरिबांनाच त्रास होतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान म्हणजे आपले स्वत:चे नुकसान करण्यासारखे असल्याचे सांगतानाच तरुणांनी सामंज्यस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रोजगार मिळत नसल्याने आरक्षणासारखे प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रश्नावर रोजगाराभिमुख शिक्षण देणे हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे जात, धर्म, भाषेच्या पलीकडे १जाऊन देशाची प्रगती साधने शक्य असून, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत धुरिणांनी तसेच संस्थांनी रोजगाराभिमुख शिक्षण देतानाच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
सोशल मीडिया दुधारी तलवार
सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. या माध्यमाचा जनसंपर्कासाठी आणि संवादासाठी जेवढा चांगला वापर होऊ शकतो, त्याचप्रमाणे अपप्रचार, फेक न्यूज आणि समाजात द्वेश पसरविण्यासारख्या विकृ त कृत्यांसाठीही होतो. परंतु, सोशल मीडियाच्या दुष्परिणांमांचा त्रास केवळ सामान्य माणसांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असला तरी सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे. सामान्य माणसाने कोणत्याही प्रकारच्या चिथावणी आणि प्रलोभनांना बळी न पडता स्वत:च्या विचारानुसार कृती करण्याचे आवाहन अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.