धनगर समाजाला आरक्षण द्यावे : एम. ए. पाचपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:49 AM2018-10-29T00:49:17+5:302018-10-29T00:50:08+5:30
महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी मंचकडे दीडशे वर्षांपूर्वीचे पुरावे व अनेक दाखले आहेत. त्या आधारावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनी मंचचे प्रदेश कार्यवाहक एम. ए. पाचपोळ यांनी केले.
नाशिकरोड : महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी मंचकडे दीडशे वर्षांपूर्वीचे पुरावे व अनेक दाखले आहेत. त्या आधारावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनी मंचचे प्रदेश कार्यवाहक एम. ए. पाचपोळ यांनी केले.
जेलरोड शिवाजीनगर येथील समाजमंदिरात धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना पाचपोळ म्हणाले की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी समाजाने एकत्र येऊन लढा दिला. अनुसूचित आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई चालू असून, ती लढाईदेखील आपण जिंकू असे पाचपोळ यांनी सांगितले. यावेळी इतर पदाधिकारीदेखील मार्गदर्शन करून समाजाची एकजूट व न्यायालयीन लढ्याबाबत चर्चा केली. मेळाव्याला महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनी मंचचे अध्यक्ष मधू शिंदे, डॉ. जे. पी. बहोल, चंद्रशेखर सोनवणे, शंकर कोळेकर, सुभाष मासुळे, डॉ.गोपाळ शिंदे, रामदास भांड, नवनाथ ढगे, सुनील ओढेकर, श्रावण लांडे, पोपट बोरकर, दिलीप पाटील, संजय सुसलादे, ऋषिकेश शिंदे, रोहिणी चव्हाण, नितीन धानापुणे आदी उपस्थित होते.