आधार केंद्राअभावी ग्रामस्थांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:44 AM2019-02-28T00:44:23+5:302019-02-28T00:44:44+5:30
शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आधार कार्ड मानले गेले असून, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार कार्ड काढण्याची कोणतीही सोय नसल्याने तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून, शासनाने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गंगापूर : शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आधार कार्ड मानले गेले असून, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार कार्ड काढण्याची कोणतीही सोय नसल्याने तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून, शासनाने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नाशिक तालुक्यातील महादेवपूर, गोवर्धन, जलालपूर, चांदशी, दुगाव, गिरणारे, मनोली, सावरगाव, गंगावºहे, महिरावनी, वाडगाव, देवरगाव, धोंडेगाव, खाड्याचीवाडी, इंदिरानगर, नाईकवाडी तसेच इतर लहान-मोठ्या गावातील ४० ते ५० वाडीवस्तीमधील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ग्रामीण भागातील नागरिकांना १० ते ४० किलोमीटर अंतर कापत आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय करून दिवसभर शहराच्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढण्यासाठी वाट पहावी लागत आहे. त्यातही नंबर लागला तर ठीक नाही तर दिवस वाया जाऊन पैसेही पाण्यात जात आहेत. या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना असह्य झाल्याने हीच बाब हेरून युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भागात असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी अथवा महादेवपूर गावात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आधार केंद्र सुरू करण्यात ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठा अन्याय झाल्याचे यावरून दिसते. यावेळी युवासेनेचे अध्यक्ष नितीन भागवत, शिवशंभू आधार फाउंडेशनचे राजू राथड, संतोष सांडखरे, अनिल पवार, उत्तम भाऊ, नवनाथ आदी उपस्थित होते.