नाशिक मर्चंट बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध हटले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:54 PM2020-02-13T12:54:44+5:302020-02-13T12:54:52+5:30

नाशिकसह राज्यात सुमारे 2 लाख सभासद असलेल्या नाशिक मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवरील प्रशासक काळात लादलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे हटविले आहेत.

Reserve Bank's restrictions on Nashik Merchant Bank removed! | नाशिक मर्चंट बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध हटले!

नाशिक मर्चंट बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध हटले!

Next

नाशिक :- नाशिकसह राज्यात सुमारे 2 लाख सभासद असलेल्या नाशिक मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवरील प्रशासक काळात लादलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे हटविले आहेत. त्यामुळे आता सभासदांना 15 टक्के लाभांश वाटण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हे निर्बंध हटविल्यामुळे आता कर्जदारांना नियमित कर्ज पुरवठा करणे, बँकेच्या शाखा उघडणे, बिल्डर्सना कर्ज पुरवठा करणे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करणे, व्याजदर कमी करणे यासह विविध योजना राबविण्यास संचालक मंडळाला अधिकार प्राप्त होणार आहेत.लाभांश पोटी 7 कोटी 52 लाख रुपये वाटण्यात येणार आहेत.तर लाभांश मिळण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची सभासदांची मागणी पूर्ण होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

Web Title: Reserve Bank's restrictions on Nashik Merchant Bank removed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.