सटाण्याच्या नगराध्यक्षांचे राजीनामा नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:39 AM2021-02-20T04:39:40+5:302021-02-20T04:39:40+5:30
थेट नगराध्यक्ष पदासाठी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापन करून सुनील मोरे यांनी बाजी मारली ...
थेट नगराध्यक्ष पदासाठी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापन करून सुनील मोरे यांनी बाजी मारली होती. त्यांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्तिगत लक्ष घालून शहराला संजीवनी ठरणारी पुनद पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने मोरे यांची कारकीर्द चर्चेत आली होती. रुवारी अचानक मोरे यांनी सोशल मीडियावर राजीनामा पत्र व्हायरल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक प्रकृती अस्वस्थेमुळे मला अध्यक्षपदाचे कामकाज करणे शक्य नसल्याने मी माझ्या पदाचा आपणाकडे राजीनामा देत आहे. तो स्विकारावा असे नमूद करून पत्राची प्रत मुख्याधिकारी यांच्या नावे नमूद केली आहे. मोरे यांच्या राजीनामा पत्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोरे यांची व्हायरल कृतीने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून अधिकारी आणि त्यांच्यातील संघर्षातून हे राजीनामा नाट्य सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तर दुसरी मोरे यांचे राजीनामा पत्र ही स्टंटबाजी असल्याचे बोलले जात आहे
इन्फो
मोरे नॉट रिचेबल
नगराध्यक्ष मोरे यांनी व्हायरल केलेल्या राजीनामा पत्राबाबत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल बंद होता. तर पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे –हिले यांच्याशी संपर्क साधला असता कोणतेही राजीनामा पत्र आपल्याकडे सादर केल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.