राजीनामा क्रमांक. ३; मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनाम्याचा फार्स, केवळ समर्थनाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 02:57 PM2018-07-26T14:57:56+5:302018-07-26T17:33:31+5:30

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे नाशिक जिल्ह्यातील पहिले आमदार ठरणार आहे.

Resignation number 3; Another MLA left the post for Maratha reservation! | राजीनामा क्रमांक. ३; मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनाम्याचा फार्स, केवळ समर्थनाचे पत्र

राजीनामा क्रमांक. ३; मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनाम्याचा फार्स, केवळ समर्थनाचे पत्र

Next

नाशिक :  जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल अहेर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांना मराठा आरक्षणाच्या समर्थनाचं पत्र दिलं आहे. हे पत्र म्हणजेच आपल्या आमदारकीचा राजीनामा असंही ते म्हणाले आहेत. परंतु, त्यांनी अद्याप विधानसभा अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांप्रमाणेच  विधानसभा अध्यक्षांकडेही राजीनामा दिला तर ते मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे नाशिक जिल्ह्यातील पहिले आमदार ठरणार आहे. राहुल अहेर यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना आपल्या पाठिंब्याचे पत्र देतानाच मराठा आरक्षणासाठी आपण पाठिंबा देत असून हे आपल्या राजीनाचे पत्र समजावे असे स्पष्ट केले आहे.

राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी आमदारकीचे राजीनामे दिले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होताना राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. सरकारने अध्यादेश न काढल्यास राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले होते. सरकारने अध्यादेश न काढल्याने घोषणा केल्याप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेलने आपला राजीनामा पाठवला आहे.

तर वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनीही मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे तसेच काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीमुळे व्यथित होऊन आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पैठण येथील आमदार संदिपान भुमरे यांनीही राज्य सरकारने मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तातडीने आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असताना नाशिक जिल्हयातूनही मराठा आमदारांवर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात असताना राहूल अहेर यांनी मराठा क्रांती मोचार्च्या समन्वयकांना आपल्या राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले असून आता ते विधानसभा अध्यक्षांना राजीनामा कधी सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Resignation number 3; Another MLA left the post for Maratha reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.