निवडणूक रिंगणातील एकमेव सदस्याचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:37 AM2019-10-15T01:37:18+5:302019-10-15T01:39:19+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील चार सदस्य रिंगणात असले तरी, त्यापैकी राष्टÑवादीचे हिरामण खोसकर या एकमेव सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांचा राजीनामा मंजूर करून त्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे.

The resignation of the only member of the electorate | निवडणूक रिंगणातील एकमेव सदस्याचा राजीनामा

निवडणूक रिंगणातील एकमेव सदस्याचा राजीनामा

Next
ठळक मुद्देचार सदस्य रिंगणात : लोकसभा निवडणुकीत झाल्या होत्या दोन जागा रिक्त

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील चार सदस्य रिंगणात असले तरी, त्यापैकी राष्टÑवादीचे हिरामण खोसकर या एकमेव सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांचा राजीनामा मंजूर करून त्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. अन्य सदस्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, मात्र निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना राजीनामा देणे अनिवार्य आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतूनच अनेकांना विधीमंडळ व संसदेत जाण्याचा योग प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना यंदा मोठ्या प्रमाणावर आमदारकीचे वेध लागले होते. त्यासाठी मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून तयारीही केली जात होती. प्रत्यक्षात राज्यातील राजकीय गणिते पाहता, अनेकांना आपल्या इच्छांना मुरड घालावी लागली तर काहींना उमेदवारीचा योग चालून आला.
मात्र तत्पूर्वीच या सदस्यांनी निवडणूक तयारी म्हणून जिल्हा परिषदेकडून ना हरकत पत्रे घेण्यासाठी अर्ज केले होते. म्हणजेच या सदस्यांकडे जिल्हा परिषदेचे काही घेणे नसल्याचे तसेच घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचे पत्र घेण्यात आले त्यासाठी विद्यमान पदाधिकाºयासह तेरा सदस्यांनी अर्ज केले. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे भास्कर गावित, राष्टÑवादीचे नितीन पवार, हिरामण खोसकर, अपक्ष यतिन कदम या चौघांनाच राजकीय पक्षांच्या उमेदवारी मिळाली आहे. यातील हिरामण खोसकर यांनी राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला तर यतिन कदम हे बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी करीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार जिल्हा परिषद सदस्यांना विधानसभा व लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बंदी नसून, निवडणूक लढविण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देण्याचीही गरज नाही. मात्र निवडून आल्यानंतर राजीनामा देणे बंधनकारक आहे. कोणताही सदस्य दोन सभागृहांचा सदस्य राहू शकत नाही. त्याचबरोबर पक्षांतर करून सदस्य निवडणुकीला सामोरे जात असेल तर मात्र पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होवू नये म्हणून सदस्यपदाचा राजीनामा देणे नैतिकदृष्ट्या गरजेचे असते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात विद्यमान चार जिल्हा परिषद सदस्य उतरलेले असले तरी, त्यातील फक्त राष्टÑवादीचे सदस्य हिरामण खोसकर यांनी आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या
अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे सुपूर्द केला. सदस्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार अध्यक्षांना असून, त्यांनी तो मंजूर करून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याकडे पाठविला. प्रशासनानेही तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या तीन जागा रिक्त
गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सदस्य डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपाची उमेदवारी घेतली होती, तर शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते धनराज महाले यांनी पक्षांतर करून राष्टÑवादीकडून उमेदवारी घेतल्याने त्यांनीही सदस्यपदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केला. या दोघांचे राजीनामे तीन महिन्यांपूर्वी मंजूर करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून दिला आहे. हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्याने आता जिल्हा परिषदेच्या तीन जागा रिक्तझाल्या आहेत.

Web Title: The resignation of the only member of the electorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.