राजीनामा सत्र सुरूच, नाशिकमधील दुसऱ्या आमदाराने समन्वयकांकडे दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:31 PM2018-07-26T15:31:12+5:302018-07-26T17:58:17+5:30

राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले

In the resignation session, the second MLA from Nashik gave his resignation | राजीनामा सत्र सुरूच, नाशिकमधील दुसऱ्या आमदाराने समन्वयकांकडे दिला राजीनामा

राजीनामा सत्र सुरूच, नाशिकमधील दुसऱ्या आमदाराने समन्वयकांकडे दिला राजीनामा

Next

औरंगाबाद : नाशिक - मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला. समाजाच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी हे राजीनामे दिले. अर्थात हे राजीनामे त्यांनी समाजाकडे दिले असून विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले नाहीत. समाज मोठा असल्याने हे राजीनामे त्यांच्याकडे दिल्याचे आहेर आणि हिरे यांनी सांगितलं 

पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आमदार थोड्याच वेळात सकल मराठा मोर्चा समन्वयकांशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे.  चांदवडचे भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी समन्वयकांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनीही मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकाकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. हिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर शहरातील पहिल्या राजीनामा देणाऱ्या आमदार ठरतील. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्षांकडे कोण प्रथम राजीनामा सुपूर्द करणार याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आह. तर मराठा क्रांती मोर्चाचा समाजाचा आमदारांवर दबाव वाढत असून आता जिल्ह्यातील आणखी कोण आमदार पुढे येतात त्याकडेही मराठा समाजाचे लक्ष आहे. 

राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी आमदारकीचे राजीनामे दिले आहे. 

Web Title: In the resignation session, the second MLA from Nashik gave his resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.