संवेदनशील निर्णयांना विरोध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:17 PM2020-01-02T23:17:43+5:302020-01-02T23:18:29+5:30
देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर्विचार व्हावा अशी मागणी येथील वासुपूज्य राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघमध्ये समाजाचे पद्भुषण प. पूज्य आचार्य देव श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.
मालेगाव कॅम्प : देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर्विचार व्हावा अशी मागणी येथील वासुपूज्य राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघमध्ये समाजाचे पद्भुषण प. पूज्य आचार्य देव श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.
मालेगाव संघातर्फे महाराजांचा प्रवेश सोहळा शहरात पार पडला. तीन दिवस महाराजांचे प्रवचन, इतर धार्मिक विधी, मार्गदर्शन सुरू आहे. सुंदर सुरीश्वर महाराज म्हणाले, सध्या देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात वरिष्ठ काही प्रश्नांमुळे युवा पिढीपुढे समस्या येऊ शकतात. लैंगिक शिक्षणांमुळे बालमनावर परिणाम होतील ही पिढी बरबाद होऊ शकते तर व्यभिचार हा कायदेशीर ठरवला गेला ही गंभीर बाब आहे. तसेच सध्या भ्रमणध्वनीवर तरुणांसह असंख्य वेबसीरिज पाहण्यात मग्न झाली आहे. या सिरीज, अश्लील संकेतस्थळ बंद होण्यासाठी राज्यसभेत आपण याचिका दाखल केली आहे. तर यापूर्वी कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या याबाबत भेटी घेतल्या आहे. आपला देश संस्कार व संस्कृतीवर पुढे जात आहे याचे भान ठेवावे. तर पैशांच्या हव्यास वाढलेला आहे. सहज, झटपट व कशाही पद्धतीने पैसा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आपण शासनाला मात्र निर्यातसह इतर दहा विषयांवरील अनुदानास विरोध केला आहे. आमच्या प्रयत्नामुळे अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचले आहे. पत्रकार परिषदेस प. पू. महाराजासह जैन संघाचे दीपक मेहता, शीतल संघवी, वस्तुपाल मेहता, सुरेश कुचेरिया, मनिष सोलंकी, कुणाल शहा, ईशान जैन, आशिष जैन, पंकज कोठारी, राकेश जैन आदी उपस्थित होते.