वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:10 AM2019-12-30T00:10:24+5:302019-12-30T00:10:39+5:30

इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

Resistance to drain the water of Vaitaran | वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

Next



नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत राज्य शासन आमच्या अधिगृहित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत करीत नाही तोपर्यंत आम्ही वैतरणाचे पाणी मुकणेत टाकू देणार नाही, याबाबतचे निवेदन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या हजारो हेक्टर जमिनीपैकी सद्यस्थित संपादित असून, परंतु शेतकरी कसत असलेल्या आणि वैतरणा धरण भरले तरी पाण्यात न जाणाºया शेकडो एकर जमिनी शासनाने मूळ मालकांना परत करावयाच्या अटीवर संपादित केलेल्या आहेत. या जमिनी संबंधित शेतकरी कसत असले तरी उतारा शासनाच्या नावाचा आहे. गेल्या अवकाळी पावसात नुकसान होऊनही हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.
मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी जाणार असल्याने येथील भूमिहीन शेतकºयांच्या वारसांना महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मागण्या जोपर्यंत महाराष्ट्र शासन पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आमचा शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयास लोकप्रतिनिधी या नात्याने न्याय मिळेपर्यंत तीव्र विरोध राहील.
- हिरामण खोसकर, आमदार

Web Title: Resistance to drain the water of Vaitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी