वाडे निर्मनुष्य करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:02 AM2018-08-11T01:02:30+5:302018-08-11T01:02:59+5:30
नाशिक : तांबट लेन येथील वाडा पडल्याने पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यातील रहिवाशांना हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मात्र त्यास विरोध करण्यात आला असून, अशाप्रकारची दादागिरी चालणार नसल्याचा इशारा पक्षाचे महापालिकेतील गटनेता गजानन शेलार यांनी दिला आहे.

राष्टÑवादी कार्यालयात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस शेलार यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यात गावठाण भागास चार चटई क्षेत्र इतकी तरतूद केली असतानाही सरकार ते लागू करीत नसून त्यासंदर्भातील आदेश रोखून ठेवण्यात आले असल्याने जुने नाशिक परिसराचा विकास ठप्प झाला आहे. यासंदर्भात फेरविचार करून नव्या बांधकामासाठी परवानगी सादर करावी अन्यथा सत्तारूढ आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
महापालिकेच्या हद्दीत एकूण २६ ठिकाणे आहेत; मात्र ते मूळ रहिवासी असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने शहराचा विकास करताना त्यांना विशेष सवलती देण्याची गरज आहे. नाशिक शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांना सर्व भागाची पाहणी करण्यास विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी नियमावलीत कलम १५ नुसार अडीच एफएसआय मंजूर केला होता; मात्र अंतिमत: विकास आराखड्यात सध्याच्या दोन चटई क्षेत्रातदेखील घट करून दीड चटई क्षेत्र ठेवण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.