शेतकरी संघटनेचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:42 PM2018-10-20T15:42:45+5:302018-10-20T15:43:08+5:30
चालु वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुले खरीपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुाळे खरीपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालु वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुले खरीपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुाळे खरीपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी. नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी साठा असून, तो पुरेसा आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, नांदगाव, चांदवड,येवला या तालुक्यांमध्ये आत्ताच टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. काही दिवसात निफाड, नाशिक, दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचीशक्यता आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडणे योग्य होणार नाही. गंगापूर डाव्या कालव्यावर लाखो रूपये कर्ज काढून द्राक्ष,डाळींब व इतर फळबागा शेतकºयांनी उभ्या केल्या आहेत. अत्यल्प पावसामुळे आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत असून, रब्बीचे पहिले रोटेशन १५ डिसेंबरला सोडण्यात यावे, शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपुर्ण कर्जमुक्ती लागू करावी, शेतीला बारा तास थ्री फेज लाईट द्यावी, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी अर्जुन बोराडे, रामनाथ ढिकले, भिमराव बोराडे, रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, सोपान कडलग आदी उपस्थित होते.