दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:44 PM2018-10-03T23:44:12+5:302018-10-03T23:44:20+5:30

उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेची इमारत, कर्ज वसुली, नवीन कर्जपुरवठा, दुष्काळ जाहीर करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कौतिक आनंदा देवरे होते.

Resolution to declare drought | दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : उमराणे सोसायटीची वार्षिक सभा

उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
संस्थेची इमारत, कर्ज वसुली, नवीन कर्जपुरवठा, दुष्काळ जाहीर करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कौतिक आनंदा देवरे होते. सर्वप्रथम संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. निवृत्ती देवरे व संचालक रामदास देवरे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक देवरे यांनी सांगितले की, इमारतीच्या
बांधकाम परवानगीसाठी अडचण येत असल्याने ती अडचण दूर करण्यासाठी सोसायटीचे शिष्टमंडळ सहायक निबंधक यांच्याशी चर्चा करणार आहे. लवकरच संस्थेची स्वमालकीची इमारत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेस सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष भरत देवरे, संचालक प्रशांत देवरे, लक्ष्मीबाई देवरे, सुवर्णा देवरे, संजय देवरे, राजेंद्र नारायण देवरे, दिलीप देवरे, सुभाष देवरे, सुपडू देवरे, लक्ष्मण नंदाळे, मांगू पवार, संदीप देवरे, नंदकिशोर देवरे,अरु णा देवरे, मीना देवरे आदींसह किरण देवरे, भिला देवरे, सचिन देवरे, भाऊसाहेब देवरे, भगवान देवरे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या स्वमालकीच्या
इमारतीचे काम रखडल्याने ते काम पूर्ण करण्यात यावे, कर्जमाफी झालेल्या सभासदांच्या नावांची यादी प्रसिद्ध करावी, नवीन कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, नवीन सभासद नोंदणी करावी, दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव आदींसह विविध विषयांवर सभासदांकडून चर्चा करण्यात आली.

Web Title: Resolution to declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.