सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:47 PM2018-09-14T17:47:34+5:302018-09-14T17:47:53+5:30

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

Resolution of declaring Sinnar taluka drought | सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

Next

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.
शालेय पोषण आहाराचा मुद्दा गेल्या बैठकीत चर्चिला जावूनही या बैठकीत तो विषयपत्रिकेत आला नाही, यावरुन भाजपाचे पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जगताप यांनी बैठकीत जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.
पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे, भाजपा गटनेते विजय गडाख, सदस्य सुमन बर्डे, वेणुबाई डावरे, रविंद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, राहिणी कांगणे, शोभा बर्के, योगिता कांदळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सबंधीत अधिकाºयांनी मनमानी करत हा विषय त्यातून वगळल्याने भाजपा सद्स्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शालेय पोषण आहार हा विषय किरकोळ नसून जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा असल्याचे सदस्य रवींद्र पगार यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे गटनेते कातकाडे यांनी मध्यस्थी करत नजरचुकीने विषय राहिला असेल तर अधिकाºयांनी आपली चूक मान्य करावी तसेच सदर विषयावर सभागृहात चर्चा करावी असे सांगितल्याने भाजप सदस्यांचे समाधान झाले.
पाणीपुरवठ्याच्या विषयावर चर्चा करतांना बारागावपिंप्रीसह ७ गाव पाणीपुरवठा योजनेत ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सबंधीत अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी सूचना उपसभापती भाबड यांनी मांडली. वावीसह ११ गावे योजनेत देखील लक्ष घाला असे सदस्य पगार यांनी सांगीतले. सभेला विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहतात. आपला तालुका जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका आहे. आपल्याच तालुक्यात अधिकारी अशाप्रकारे मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे मत गटनेते विजय गडाख यांनी मांडले.
बैठकीत वनविभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, विजवितरण विभाग, आरोग्य यासह विविध विभागांच्या योजना आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Resolution of declaring Sinnar taluka drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी