पाणी आवर्तन एकाच वेळी सोडण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:42 PM2018-11-17T17:42:38+5:302018-11-17T17:42:52+5:30

कसबे सुकेणेत बैठक : चार आवर्तनांची मागणी

 Resolution of leaving water recurrent at the same time | पाणी आवर्तन एकाच वेळी सोडण्याचा ठराव

पाणी आवर्तन एकाच वेळी सोडण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देद्राक्षबागा वाचविण्यासाठी नोव्हेंबर अखेर तातडीने आवर्तन देण्याची मागणी शेतक-यांनी यावेळी केली.

ओझर : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर डावा कालवा व पालखेड उजवा कालव्याच्या पाण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळी पालखेड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कापडणीस, गंगापुर डाव्या कालव्याचे शाखा अभियंता पी.डी.बोरस्ते, व्ही. एम. चौधरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याच्या समस्या आमदार अनिल कदम यांच्याकडे मांडल्या. उजवा व गंगापूर डावा या दोन्ही कालव्याचे एकाच वेळी आवर्तन सोडण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेऊन आवर्तन तारखा जाहीर करण्यात येणार असून उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून ४ आवर्तन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अनिल कदम यांनी यावेळी सांगितले. द्राक्षबागा वाचविण्यासाठी नोव्हेंबर अखेर तातडीने आवर्तन देण्याची मागणी शेतक-यांनी यावेळी केली. आमदार कदम यांनीही कालवा सल्लागार बैठकीत त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आगामी काळात तीव्र पाणी टंचाई जाणवणार असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन कदम यांनी यावेळी केले.
बैठकीस जि.प सदस्य दीपक शिरसाठ बाजार समिती संचालक केशव बोरस्ते पंचायत समिती सदस्य शंकर संगमनेरे, अर्जुन बोराडे, वासुदेव काठे, अशोक भंडारे, विश्वास भंडारे, सतीश मोगल, बाळासाहेब जाधव, धोंडीराम जाधव, छगन जाधव, देविदास चौधरी, विनायक चौधरी, चिंधू चौधरी, केशव झाल्टे, प्रताप झाल्टे, नाना पठाडे, रामनाथ आहेर, सचिन वाघ, भास्कर गवळी आदिसह शेतकरी तसेच पालखेडमदील सर्व पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Resolution of leaving water recurrent at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.