मालेगाव मनपाचा ठराव विखंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:21 AM2019-03-15T00:21:07+5:302019-03-15T00:25:28+5:30
मालेगाव महापालिका मालकीची जागा, गाळे खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा महासभेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्धचा दोषारोपाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांना दिले आहेत.
मालेगाव मध्य : महापालिका मालकीची जागा, गाळे खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा महासभेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्धचा दोषारोपाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांना दिले आहेत. या आदेशामुळे भाडेतत्त्वावर गाळे व जागा घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मालेगावच्या अपर जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून तसा अहवाल नाशिकच्या जिल्हाधिकाºयांना सादर केला होता. त्यांनी तो नगरविकास विभागास सादर केला होता. सदर चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या असून, महानगरपालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध असल्याने तत्कालीन मनपा आयुक्त लतीश देशमुख, उपायुक्त (कर) राजेंद्र फातले, सहायक आयुक्त (कर) समसुद्दीन शेख उमर व संकीर्ण कर अधीक्षक संजय साबळे यांच्या नावाचा उल्लेख पत्रात आहे. याप्रकरणी शिस्तभंग कारवाई करावी तसेच या दोषी असलेल्यांविरुद्ध दोषारोपासह प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशी अधिकारी नियुक्त
शहरातील किदवाई रस्त्यावरील प्राथमिक शाळेस लागून असलेल्या मनपाच्या मालकीची जागा अहमद नसीम मिना नगरी एज्युकेशनल सोशल अॅण्ड वेल्फेअर सोसायटीस ११ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत महासभेत ठराव क्रमांक ५० दि. १८ मे २०१५ रोजी करण्यात आला होता. याविरोधात २८ मे २०१५ रोजी मुस्तकीम डिग्निटी यांनी दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी सदर प्रकरणाची चौकशी करणेकामी चौकशी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांची नेमणूक केली होती.