गडावरील ग्रामसभेत बीअर शॉपीचा ठराव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 12:15 AM2022-05-01T00:15:56+5:302022-05-01T00:16:38+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला.
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला.
गडावरील ग्रामपंचायतीत शनिवारी महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये गडावर बीअर शॉपीसाठी परवानगी मिळावी हा ठराव महिलांनी रद्द करण्याची आग्रही भूमिका घेत व सदर ठराव रद्द करण्यात आला. यावेळी सरपंच रमेश पवार, उपसरपंच मनीषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, बेबीबाई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अजित दुबे, महिला रणरागिनी शोभा माळी पिंपळे, अनिता बर्डे, आशाबाई जहागिरदार, मीना गांगुर्डे, सविता थविल, ग्रामसेवक संजय देवरे आदी उपस्थित होते.
सप्तशृंगगड हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ग्रामसभेत बिअरच्या दुकानासाठी अर्ज आला होता. आम्ही शंभर ते दीडशे महिलांनी हा ठराव ग्रामसभेत धुडकावून लावला. या अगोदर दारूमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये त्यामुळे हा निर्णय घेतला.
- शोभा माळी, ग्रामस्थ, सप्तशृंगगड