कृषी समितीच्या बैठकीत ठराव संमत
By Admin | Published: May 20, 2015 11:46 PM2015-05-20T23:46:54+5:302015-05-20T23:50:08+5:30
कांदा चाळीचे २० कोटींचे अनुदान तत्काळ द्या
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे म्हणून गेल्या काही महिन्यांपासून तीन हजारहून अधिक लाभार्थींचे २० कोटी रुपये अनुदान मिळण्याचे प्रस्ताव प्रलंबित असून, राज्य शासनाने ते तातडीने उपलब्ध करून द्यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक बैठक सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागांच्या विविध योजनांवर चर्चा झाली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे, ग्रीन पॉलिहाऊस व शेडनेटसह अन्य योजनांचे लक्षांक जिल्ह्णाला प्राप्त झालेले नसून ते लवकरात लवकर लक्षांक उपलब्ध करून देण्यात यावे, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान प्रलंबित असून, ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तसेच गेल्या काही महिन्यांपासून कांदा चाळीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्णातील जवळपास तीन हजार शेतकरी लाभार्थ्यांचे सुमारे २० कोटी रुपये अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असून, तेही तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत संमत करण्यात येऊन तो शासनास पाठविण्यात येणार आहे. बैठकीस सदस्य केरू पवार, भावना भंडारी, अर्जुन बर्डे, सुनीता चव्हाण, मनीषा बोडके,गणपत वाघ, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)