सावकी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:21 AM2017-08-19T01:21:56+5:302017-08-19T01:22:50+5:30

देवळा तालुक्यातील सावकी येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदी झालीच पाहिजे असा ठराव करीत येथील महिला व पुरु षांनी गावातून रॅली काढली तसेच ग्रामसभेत उपस्थित महिलांनी आपल्यावर होणाºया अत्याचाराचे प्रसंग सांगितल्याने सावकी गावात बाटली आडवी करण्यासाठी महिलांनी चांगलीच कंबर कसली आहे. सावकी गांव व्यसनमुक्त करायचे तसेच गावात १०० टक्के दारू बंदी झालीच पाहिजे आदी ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत करण्यात आले.

The resolution of the slaughterhouse in Savaki Gram Sabha | सावकी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

सावकी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

googlenewsNext

लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदी झालीच पाहिजे असा ठराव करीत येथील महिला व पुरु षांनी गावातून रॅली काढली तसेच ग्रामसभेत उपस्थित महिलांनी आपल्यावर होणाºया अत्याचाराचे प्रसंग सांगितल्याने सावकी गावात बाटली आडवी करण्यासाठी महिलांनी चांगलीच कंबर कसली आहे. सावकी गांव व्यसनमुक्त करायचे तसेच गावात १०० टक्के दारू बंदी झालीच पाहिजे आदी ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत करण्यात आले.
या ठरावाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असल्याची माहिती सावकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कारभारी पवार यांनी यावेळी दिली. येत्या २० तारखेपर्यत सावकी गावात दारूबंदी झाली नाही तर गावातील महिला आक्र मक होऊन कठोर पाऊल उचलतील असा कडक इशारा यावेळी देण्यात आला आहे.
वृक्ष लागवड, ग्रामस्वच्छतेची शपथ, महिला विषयक उपक्र म व इतर विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच कारभारी पवार, निलेश पाटील, अरु ण शिवले, दिलीप शिवले, केवळ भामरे, प्रतापराव पाटील, रामदास गोधडे, याचे सह ग्रामपंचायतीचे सदयस, ग्रामसेविका वैशाली पवार, जिभाऊ शिवले, जिभाऊ निकम,अयुब पटेल, बापू बोरसे, सुंदर तिवारी, यांच्यासह बचतगटाच्या महिला, आदिसह ग्रामस्थ विशेषत : महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: The resolution of the slaughterhouse in Savaki Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.