गोंदे दुमालाच्या युवकांकडून ग्रामविकासासाठी संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:31 PM2019-07-02T14:31:21+5:302019-07-02T14:32:18+5:30
घोटी : ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे पालन कोणी करीत नाही. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवकांचे विचार जागवले. शिवरायांना वंदन करून ग्रामविकास करण्याचा संकल्प केला.

नुकत्याच पार पडलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलने घवघवीत यश मिळवले. थेट सरपंच म्हणून शरद उर्फ दादू सोनवणे विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गणपत जाधव, शोभा नाठे, सीताबाई नाठे, कृष्णा सोनवणे, परशराम नाठे, दीपिका नाठे, लिलाबाई नाठे हे विजयी झाले. विकास पॅनेलने गोंदे दुमाला गावात भरघोस विकास करण्यासाठी जनतेचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे. त्यानुसार गावातील १२० तरूणांसह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी रायगड किल्ला सर केला. शिवरायांच्या विचारांचा जागर करून ग्रामविकास करण्याचा संकल्प तरूणांनी केला. या कार्यक्र मासाठी सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या गडकिल्ले मोहिमेतून सहकार्य मिळाले.
यावेळी हिरामण नाठे, अनिल सातपुते, विनोद जाधव, विनोद नाठे, अजय नाठे, सुनील नाठे, अमोल टर्ले, सुनील आहेर, बाळासाहेब सोनवणे, निलेश सोनवणे, राहुल खातळे, सागर नाठे, माधव नाठे, रवी नाठे, शिवराम जाधव, नितीन जाधव, नितीन सातपुते, शहाजी नाठे, शंकर नाठे, भाऊसाहेब बोडके, बाळासाहेब मेंगाळ, अमोल खरोटे, गणपत नाठे आदी युवक उपस्थित होते.