खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’ जोपासण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:23 PM2018-04-25T14:23:02+5:302018-04-25T14:23:02+5:30

निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे.

 Resolve to develop a 'Memorial Tree' from the money of the Khao | खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’ जोपासण्याचा संकल्प

खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’ जोपासण्याचा संकल्प

Next

निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्या मंदिराच्या इयत्ता चौथीच्या कब - बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ‘आठवणीचं झाड’ शाळेत लावून ते जोपासण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी सोडला. चिमुकल्यानी आपल्या खाऊचे पैसे जमा करून झाडाच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड खरेदी करून मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. बेसुमार होणारी जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधण्यासाठी चिमुकल्यानी झाड लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या प्रसंगी मुलांनी झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी, एक दोन तीन चार झाडे लावा फार फार, अशा विविध घोषणां दिल्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या उपक्र मास न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त अँड. ल. जि. उंगावकर, वि. दा. व्यवहारे, , राजेंद्र राठी, किरण कापसे, अँड. दिलीप वाघावकर, राजेश सोनी मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणअधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस.बी.थोरात, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप उपस्थित होते. या उपक्र मासाठी शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Resolve to develop a 'Memorial Tree' from the money of the Khao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक