कडवा योजनेच्या वीजवाहिनीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:22+5:302021-02-05T05:36:22+5:30
योजनेचे काम चार वर्षे रखडल्यानंतर २०१९ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी या प्रश्नी नगरपालिकेत बैठक घेतली होती. कडवा धरण ...
योजनेचे काम चार वर्षे रखडल्यानंतर २०१९ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी या प्रश्नी नगरपालिकेत बैठक घेतली होती. कडवा धरण ते साकुर फाटा-सबस्टेशन या भागात ११ के व्ही लाईन टाकल्याशिवाय पूर्ण क्षमतेने ४५० एच पी चे दोन पंप अविरत सुरू रहाणे शक्य नव्हते. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करूनही साकुर फाटा भागातील व्यावसायिकांकडून पाहिजे असा प्रतिसाद नगरपालिका प्रशासनाला मिळाला नाही, त्यामुळे कोकाटे यांनी थेट साकुर फाट्यावर स्थानिकांना पाचारण करून तिथे बैठक घेतली होती. दरम्यान, कोकाटे व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नगरपालिका मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, पंकज जाधव, देवा आवारे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी यांनी साकुर येथील शेतकरी-व्यापारी यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले. २७ जानेवारीला प्रत्यक्षात काम सुरू झाले परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून लाईन टाकण्यास विरोध केला. अखेर महामार्गाने लाईन टाकणे हाच पर्याय उरला होता. त्यानुसार नाशिक पोलीस अधीक्षक, इगतपुरी प्रांत, इगतपुरी तहसील आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यासोबत चर्चा होऊन राष्ट्रीय महामार्गाने या लाईनचे काम सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. शनिवारी (दि. ३०) पोलीस ताफ्यासह प्रत्यक्ष काम सुरू झाले आणि कडवा धरण ते साकुर सब स्टेशनपर्यंत तब्बल ४० लाईट पोल उभे केले गेले.
फोटो - ३० सिन्नर कडवा-३
सिन्नर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी कडवा धरण ते साकुर फाटा-सबस्टेशन या भागात ११ के व्ही लाईनचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.
===Photopath===
300121\30nsk_19_30012021_13.jpg
===Caption===
फोटो - ३० सिन्नर कडवा-३ सिन्नर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी कडवा धरण ते साकुर फाटा-सबस्टेशन या भागात ११ के व्ही लाईन चे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.