अभियांत्रिकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:39 AM2019-09-16T00:39:14+5:302019-09-16T00:39:38+5:30

देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला.

Respect for engineering quality students | अभियांत्रिकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अभियांत्रिकीच्या गुणवंत सत्कारार्थी विद्यार्थ्यांसमवेत महिंद्र्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख व नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह संतोष मुथा, अजित पाटील, विपूल मेहता, श्रीकांत बच्छाव, मनीष कोठारी, नरेंद्र बिरार, टी़ एऩ अग्रवाल, सुमित खिंवसरा, राजकुमार सिरसम, संजय देशपांडे आदी.

Next
ठळक मुद्देगुणगौरव : इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट नाशिक सेंटरतर्फे अभियंता दिन उत्साहात

नाशिक : देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला.
दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स इंडियाच्या नाशिक लोकल सेंटतर्फे संस्थेच्या अशोका सभागृहात रविवारी (दि.१५) अभियांत्रिकी विद्याशाखेतील गुणवंंत विद्यार्थ्यांचा महिंद्र्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, अशोका ग्रुपचे अध्यक्ष तथा नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. उपस्थित नाशिक लोकल सेंटरचे अध्यक्ष संतोश मुथा, मानद सचिव अजित पाटील, सहसचिव ़विपूल मेहता, श्रीकांत बच्छाव हे व्यासपीठावर होते़ उपस्थित मान्यवरांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन करतानाच नवनवीन संशोधनांचा ध्यास घेत समाज जीवन सुखकर करण्यासाठी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला. यावेळी नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, नरेंद्र बिरार, टी़ एऩ अग्रवाल, सुमित खिंवसरा, राजकुमार सिरसम, संजय देशपांडे, गिरीश पगारे, विलास पाटील, धिरज पिचा, दिनकर बोडके, सहस्त्ररष्मी पुंड, नयनिश जोशी, संजय दीक्षित, अशोक डोंगरे, डी़ बी. गोरे आदी विविध क्षेत्रांत कार्यरत अभियंते उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
नाशिक विभागातील विविध महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यात दुर्गेश थोरात, मयुर आहिरे, रुतुजा निकूम, दिव्या मस्के, वैशाली जमदाडे, श्रावनी चव्हानके, शुभम वाबळे, जुही भुरे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक, अक्षय गांगुर्डे, प्रिया सोनवणे, स्नेहल वाघ, भैरवी पवार, प्रियंका चांदोरे, अभिषेक जाधव, लोकेश अतारडे, श्रेयष गायनार आदी विद्यार्थांचा समावेश होता.

Web Title: Respect for engineering quality students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.