दहावीतील गुणवंतांबरोबरच पालकांचाही सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:38+5:302021-08-02T04:06:38+5:30

विद्यार्थी वेदांत घुगे, प्रसाद निकम, निशुका अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून भालचंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना ...

Respect to the parents along with the meritorious students of class X. | दहावीतील गुणवंतांबरोबरच पालकांचाही सत्कार

दहावीतील गुणवंतांबरोबरच पालकांचाही सत्कार

Next

विद्यार्थी वेदांत घुगे, प्रसाद निकम, निशुका अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून भालचंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने ऑनलाईन तंत्राचा परिणामकारक वापर करून शिक्षणाचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल शाळेचे आभार मानले. शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे यांनी अध्यक्षीय मनोगतात कोरोना बॅच म्हणून पाहिले जाईल, त्यामुळे पुन्हा एकदा मागील उजळणी करून पुढील शिक्षणासाठी वाटचाल करावी व आपण गुणवंत आहोत हे दाखून द्यावे. या प्रसंगी संकुल प्रमुख शशिकांत आंबेकर, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप, टी.एम. सदस्य भैय्यासाहेब चव्हाण, भास्कर मधे, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार गुलाब पाटील यांनी मानले.

----------------------------

नांदगावी एसएससी परीक्षेतील यश प्राप्त केलेले व्ही. जे. हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी. समवेत संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक. (३१ नांदगाव व्हीजे)

310721\445731nsk_10_31072021_13.jpg

३१ नांदगाव व्हीजे

Web Title: Respect to the parents along with the meritorious students of class X.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.