सामाजिक संस्थांच्या सन्मानाने डॉक्टरांना नवी ऊर्जा दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:12+5:302021-07-07T04:18:12+5:30
सिन्नर : कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता सर्व डॉक्टरांनी जे काम केले, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, ...
सिन्नर : कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता सर्व डॉक्टरांनी जे काम केले, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, हे काम करीत असताना अनेक सामाजिक संस्थांनी डॉक्टरांचा सन्मान करून त्यांना नवी ऊर्जा दिली. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचविले, असे प्रतिपादन सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांनी केले.
सिन्नर शहरातील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व डॉक्टरांचा हॉटेल पंचवटी येथे सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष संजय सानप, लायन्स क्लब ऑफ युनिटीचे अध्यक्ष नंदकुमार निऱ्हाळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, आएमए संघटनेचे सिन्नर तालुका अध्यक्ष डॉक्टर डी. एम. गडाख, सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, सचिव डॉ. दीपक आव्हाड आदी उपस्थित होते.
डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख यांनी लायन्सने डॉक्टरांच्या केलेल्या सन्मानाचे कौतुक केले. कांतीभाई पटेल यांनी सूत्रसंचालन, तर मनीष गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. आभार महेंद्र तारगे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. जी. एल. पवार, डॉ. पंकज नावंदर, डॉ. भानुदास आरोटे, लायन्स क्लबचे डॉ. विष्णू अत्रे, डॉ. विजय लोहारकर, डॉ. संदीप शिंदे, डॉ. प्रताप पवार, डॉ. सुजाता लोहारकर, शिल्पा गुजराथी, डॉ. जितेंद्र क्षत्रीय, डॉ. लीना क्षत्रीय, डॉ. उमेश येवलेकर, मारुती कुलकर्णी, सोपान परदेशी, कल्पेश चव्हाण, स्वप्नील धूत, पानगव्हाणे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - ०६ सिन्नर डॉक्टर
सिन्नर शहरातील डॉक्टरांचा सन्मान करताना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि लायन्स क्लब ऑफ युनिटीचे पदाधिकारी.
060721\06nsk_23_06072021_13.jpg
सिन्नर शहरातील डॉक्टरांचा सन्मान करताना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि लायन्स क्लब ऑफ युनिटीचे पदाधिकारी.