‘वर्दी’चा मान राखणे हीच ठरेल खरी श्रध्दांजली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:55+5:302021-03-25T04:15:55+5:30
नाशिक जिल्ह्यासह परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधूनदेखील ग्रामीण पोलीस दलातील अनुकंपा तत्वावरील अनुशेष भरुन काढण्याची मागणी जोर ...
नाशिक जिल्ह्यासह परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधूनदेखील ग्रामीण पोलीस दलातील अनुकंपा तत्वावरील अनुशेष भरुन काढण्याची मागणी जोर धरु लागत होती. बुधवारी (दि.२४) विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाच्या ‘समर्पण’ सभागृहात दिघावकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ पाल्यांना अनुकंपाच्या रिक्त जागांमध्ये स्थान देत ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून दाखल करुन घेण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हेदेखील उपस्थित होते.
दिवसेंदिवस अनुकंपा यादी लांबच लांब होत चालल्याने दिघावकर यांनी या पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना अनुकंपा यादीतील बहुप्रतीक्षेत दिवंगत पोलीस पाल्यांच्या अर्जांची छाननी करत तत्काळ प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश काढले. यानुसार कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे, वरिष्ठ श्रेणी लिपिक सुनील महाजन, महेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेत मागील महिनाभरापासून हा ‘टास्क’ हाती घेतला होता. ज्या दिवंगत पोलिसांच्या पाल्यांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता अशा अर्जांची छाननी करत त्यांची शारिरिक पात्रता तपासणी, कागदपत्रांसह चारित्र्य पडताळणी, वैद्यकिय तपासणी पुर्ण करण्यात आली. यानंतर जिल्ह्यातील ९८पैकी २२ अर्जदारांची पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे दिघावकर म्हणाले. जिल्ह्यातील ग्रामीण पाेलीस दलाकरिता अनुकंपा यादी मोठी असून बहुप्रतिक्षेचा निकष लक्षात घेत २२ पाल्यांना या टप्प्यात स्थान देण्यात आले असून ७६ जागा अद्यापही रिक्त आहेत.
---इन्फो--
पाच जिल्ह्यांतील १२६ पोलीस पाल्यांची नियुक्ती
नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमधील दिवंगत पोलीस पाल्यांच्या अर्जांची पडताळणी करत सर्वाधिक जळगावमधून ६८ तर नाशिक-२२, अहमदनगर-२५, धुळे-५, नंदुरबार-६ याप्रमाणे परिक्षेत्रातील १२६ पोलीस पाल्यांना संबंधित जिल्ह्यांच्या ग्रामीण पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
---इन्फो--
लिपिक संवर्गाचाही गांभीर्याने विचार
अनुकंपा तत्वावर ज्या पोलीस पाल्यांनी लिपीक पदासाठी अर्ज केलेले आहेत, अशा अर्जांचाही गांभीर्याने विचार केला जात असल्याचे प्रताप दिघावकर यांनी सांगितले. याबाबत आढावा घेतला असून बिंदु नामावलीनुसार जिल्हानिहाय नियुक्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. लवकरच अनुकंपा तत्वावर नाशिक परिक्षेत्रात लिपीक पदाकरिता आलेल्या पोलीस पाल्यांच्या अर्जांची दखल घेत त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे दिघावकर यावेळी म्हणाले.
----
फोटो आर वर : २४पोलीस१/ २४पोलीस२ नावाने सेव्ह आहे.
--
कॅप्शन :
२४पोलीस१/ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात पोलीस पाल्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत ग्रामीण पोलीस दलात स्वागत करताना विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील.
--
२४पोलीस२/ पोलीस शिपाई म्हणून ग्रामिण पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या भावी युवा पोलिसांशी हितगुज करत त्यांना कानमंत्र देताना प्रतापराव दिघावकर. समवेत सचिन पाटील.
===Photopath===
240321\24nsk_38_24032021_13.jpg~240321\24nsk_39_24032021_13.jpg
===Caption===
विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात पोलीस पाल्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत ग्रामीण पोलीस दलात स्वागत करताना विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील.~विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात पोलीस पाल्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत ग्रामीण पोलीस दलात स्वागत करताना विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील.