नांदूरशिंगोटेत आरोग्य शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:38 PM2019-05-26T17:38:43+5:302019-05-26T17:38:58+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व डॉ. विजय घुगे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व डॉ. विजय घुगे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
येथील रेणुकामता सभागृहात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबाराचे उद्धाटन जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपिठावर उपसरपंच अनिल शेळके, माजी उपसरपंच भारत दराडे, उत्तम बर्के, शरद शेळके, नानापाटील शेळके, डॉ. राधाकृष्ण सांगळे, सुरेखा सानप, डॉ. शांताराम घुगे, शंकरराव शेळके, शिवनाथ शेळके, निवृत्ती शेळके, पांडूरंग गर्जे, राजेंद्र खर्डे, अनंता घुले आदी उपस्थित होते. शिबिरात डोके दुखी, फिट येणे, चक्कर येणे आदींसह विविध आजारांची वैद्यकीय तपासणी मेंदु व मणके विकार तज्ञ डॉ. विजय घुगे यांनी केली. शिबिरात परिसरातील १५० महिला व पुरूषांनी सहभाग नोंदवला.