अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये लायन्स क्लब आॅफ सिन्नर फेस्टिव्हलच्या स्पर्धांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:46 PM2018-02-10T23:46:09+5:302018-02-11T00:43:28+5:30

सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने येत्या १६ फेब्रुवारीपासून ‘लायन्स सिन्नर फेस्टिव्हल’चे अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

Respond to Lions Club of Sinner Festival, Ashok Valley of Flowers | अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये लायन्स क्लब आॅफ सिन्नर फेस्टिव्हलच्या स्पर्धांना प्रतिसाद

अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये लायन्स क्लब आॅफ सिन्नर फेस्टिव्हलच्या स्पर्धांना प्रतिसाद

Next
ठळक मुद्देस्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसादखरेदी व मनोरंजनाचा आनंद

सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने येत्या १६ फेब्रुवारीपासून ‘लायन्स सिन्नर फेस्टिव्हल’चे अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत लायन्स वैयक्तिक व समूह नृत्य, मिस आणि मिसेस सिन्नर, मिस्टर सिन्नर आणि लिटल मास्टर या स्पर्धांच्या प्राथमिक फेºयांना प्रारंभ झाला असून, स्पर्धकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लायन्सच्या सिन्नर शाखेची स्थापना सन १९९८ मध्ये झाली असून, क्लबच्या माध्यमातून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्यात आदर्श शिक्षक पुरस्कार, सर्वरोगनिदान शिबिर, इको फ्रेण्डली गणपती फेस्टिव्हल, मापरवाडीत स्वत:ची बालवाडी यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. सन २०१६ मध्ये क्लबने पहिल्यांदाच सिन्नर फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. त्यास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे यंदा पुन्हा या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास ५ दिवस हा फेस्टिव्हल अशोका व्हॅली आॅफ फ्लॉवरमध्ये रंगणार असून, त्यात एकाच छताखाली खरेदी व मनोरंजनाचा आनंद सिन्नरकरांना लुटता येणार आहे. येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात या स्पर्धेच्या प्राथमिक फेºया होणार आहेत. पहिल्या दिवशी लायन्स सिन्नर फेस्टिव्हलच्या ग्रुप डान्स स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. या फेरीत सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कान्हा सो जा जरा, मोरया मोरया, सूर निरागस हो, सबसे आगे होंगे हिंदूस्थानी, दिंडी चालली, गोविंद बोलो..गोपाल बोलो आदिंसह विविध गाण्यांवर स्पर्धकांनी नृत्य सादर केले. या विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून डॉ. सौ. सुजाता लोहारकर, सौ. शील्पा गुजराथी, हेमंत देवनपल्ली, राजाराम मुंगसे, अर्पणा क्षत्रिय, संगीता कट्यारे काम करीत आहेत. लायन्स नृत्य स्पर्धेची (गु्रप) अंतिम फेरी शनिवार (दि. १७) रोजी अशोका व्हॅली आॅफ फ्लॉवर्स येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यातील विजेत्यांना मराठी चित्रपट अभिनेत्री व नृत्यांगणा भार्गवी चिरमुले यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवार (दि. १८) रोजी अशोका व्हॅली आॅफ फ्लॉवर्स येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यातील विजेत्यांना मराठी चित्रपट अभिनेता व मराठी मालिका घाडगे अ‍ॅण्ड सून फेम अक्षय अर्थात चिन्मय उदगिरकर यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. लायन्स नृत्य स्पर्धेची (सोलो) अंतिम फेरी सोमवार (दि. १९) रोजी अशोका व्हॅली आॅफ फ्लॉवर्स येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यातील विजेत्यांना सुप्रसिध्द टिव्ही स्टार तुझं माझं ब्रेकअप फेम मेनका अर्थात मीरा जोशी यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या विविध स्पर्धेच्या अंतिम फेºयांसाठी सिन्नरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख, लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत वाजे, प्रकल्प प्रमख कृष्णाजी भगत, डॉ. विजय लोहारकर, रमेश जगताप, हेमंत नाईक, त्र्यंबक खालकर, मनीष गुजराथी, डॉ. भारत गारे यांच्यासह लायन्स क्लबच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

Web Title: Respond to Lions Club of Sinner Festival, Ashok Valley of Flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक