‘पाड्यावर चला’ या कार्यक्र मास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 06:09 PM2019-02-18T18:09:29+5:302019-02-18T18:10:19+5:30
वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या कार्यक्र माचे निययोजन करण्यात आले होते.

प्रारंभी पाड्यावरील सर्व लोकांना देशावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची माहिती देऊन शहिदांना आदरांजली अर्पण करून वंदन देण्यात आली. त्यानंतर पाड्यावरील मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स, नवीन खेळणी, नवीन कपडे, चपला, बूट देऊन प्रेमाची गरज खरी या लोकांना आहे, याची जाणीव करुन देण्यात आली.
यावेळी सदर मुलांना डोसा, इडली, मेदूवडा हि नाव कधी ऐकली आहेत का? असा विचारताच नाही हा एकच शब्द मुलांसोबत त्यांच्या पालकांचाही निघाला. नाशिक शहरापासून अवघ्या ५० किमी वर अश्या परिस्थिती भीषण वास्तव समोर ठेवत डोसा, इडली, मेदूवडा असे पदाथॅ या मुलांना व त्यांच्या पालकांना यावेळी खाऊ घालण्यात आले.
या कार्यक्र मास बिइंग कॉमनचे संस्थापक अध्यक्ष विक्र म कदम, ‘पाड्यावर चला’ या उपक्र मास प्रतिसाद देणारे साधू वासवाणी परिवाराचे मोहन करिरा, दिनेश बदलानी, वंशिता बदलानी, बिइंग कॉमन संस्थेचे अक्की भडके, दीपाली कदम, प्रियांका टर्ले, संदीप देठे, शिवानी टर्ले, समृद्धी कदम, श्रेयस कदम आदींसह हेदुलीपाडा येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो १८ वेळूंजे, १८ वेळूंजे १)