पोलीस भरती प्रशिक्षणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:58 AM2018-03-03T00:58:06+5:302018-03-03T00:58:06+5:30
राज्यभरातील पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे़ गुरुवार (दि़ १ मार्च)पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचा शनिवारी (दि़३) समारोप होणार असून, सुमारे चारशे उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
नाशिक : राज्यभरातील पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे़ गुरुवार (दि़ १ मार्च)पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचा शनिवारी (दि़३) समारोप होणार असून, सुमारे चारशे उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यात पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया राबविली जाणार असून, उमेदवारांकडून आॅनलाइन फॉर्म भरून घेतले जात आहेत़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलीस भरतीतील उमेदवारांना मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांचा सराव व्हावा यासाठी तीन दिवसीय मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू केले़ शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारपासून या प्रशिक्षणास सुरुवात झाली़ गुरुवारी उमेदवारांना करावी लागणारी कागदपत्रांची पूर्ततेबाबत माहिती देऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़ शुक्रवारी (दि़२) प्रत्यक्ष मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात आली, तर शनिवारी (दि़३) पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल व वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ व्यक्ती लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत़