कडाक्याच्या थंडीतही योगाथॉनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:16 AM2019-02-11T00:16:43+5:302019-02-11T00:25:33+5:30

कडाक्याची थंडी असतानाही सूर्यदेवतेच्या नामस्मरणाने एकामागोमाग एक घालण्यात आलेल्या सूर्यनमस्काराच्या निमित्ताने सूर्याच्या उपासनेबरोबरच आरोग्याबाबतची सजगता जाणवली ती योगाथॉन- २०१९च्या अनोख्या उपक्रमात. शहरातील तब्बल सातशे मुली-महिलांच्या सहभागातून या उपक्रमाला प्रतिसाद लाभलाच शिवाय त्यातील ६३० सहभागी सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करत सुवर्णपदकही पटकावले.

Responding to Yogathon in the cold of the day | कडाक्याच्या थंडीतही योगाथॉनला प्रतिसाद

कडाक्याच्या थंडीतही योगाथॉनला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देसूर्योपासना : सहाशे जणांनी पटकावले सुवर्णपदक; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

नाशिक : कडाक्याची थंडी असतानाही सूर्यदेवतेच्या नामस्मरणाने एकामागोमाग एक घालण्यात आलेल्या सूर्यनमस्काराच्या निमित्ताने सूर्याच्या उपासनेबरोबरच आरोग्याबाबतची सजगता जाणवली ती योगाथॉन- २०१९च्या अनोख्या उपक्रमात. शहरातील तब्बल सातशे मुली-महिलांच्या सहभागातून या उपक्रमाला प्रतिसाद लाभलाच शिवाय त्यातील ६३० सहभागी सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करत सुवर्णपदकही पटकावले.
श्री. डी. एम. पगार हेल्थ अ‍ॅन्ड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गंगापूररोड येथे रविवारी (दि. १०) योगाथॉनचा उपक्र म पार पडला. त्यानंतर पूरक व्याख्यान व नंतर सलग बारा सूर्यनमस्कारांचे एक अशी नऊ आवर्तने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सहायक पोलीस आयुक्त माधुरी कांगणे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा, रोहिणी नाईक, उपक्र माच्या सदिच्छादूत डॉ. नमिता कोहोक उपस्थित होते. १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर शेवटच्या सत्रात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सूर्यनमस्कारांतून हृदयाशी संबंधित सर्व आजार दूर राहत असल्याचे दाखले दिले आहेत. त्यामुळे हा उपक्र म म्हणजे थेट हृदयाशी नातं सांगणारा असल्याचेही सांगितले.
आयोजिका डॉ. स्वाती पगार यांनी योगाथॉन व सूर्यनमस्कारामागील शास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या माहिती दिली. तर आयोजिका डॉ. प्रणिता गुजराथी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जयश्री सूर्यवंशी, संदीप चिंचोलीकर, ललित जाधव, व्यंकटेश पाटील, अनिल निकम, मनीष हिरे, दीपक पाटील, भूषण वाणी, शीतल जाधव, श्रद्धा राठोड, सरोज निकम, शुभदा जगदाळे, तृप्ती वाणी, कविशा पाटील, श्वेता देशपांडे, डॉ. मनीष पवार, चतुर नेरे आदी उपस्थित होते.

स्वानंदी वालझाडे या विद्यार्थिनीने रिदमिक योगासनांचे सादरीकरण केले. त्यानंतर स्वयम पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या जलतरणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. एस.डी.एम.पी. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी प्रास्ताविकात नाशिककरांच्या आरोग्यासाठीचा हा योगयज्ञ असल्याचे सांगितले.

Web Title: Responding to Yogathon in the cold of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.