मोफत नेत्र तपासणी शिबीरला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 07:17 PM2019-09-24T19:17:30+5:302019-09-24T19:18:14+5:30
दिंडोरी : येथील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मंच अंतर्गत मंगळवारी (दि.२४) तळेगाव येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

जनजागृती रॅलीने शिबिराची सुरुवात करण्यात आली. तळेगाव गावामध्ये नेत्र तपासणी रॅली काढून एन.एस.एस. स्वयंसेवकांनी विविध घोषणाच्या आधारे जनजागृती केली.
यावेळी सरपंच माधव चारोस्कर, उपसरपंच पुष्पा पालवे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक भगवंत चकोर, माजी उपसरपंच गोकुळ चौधरी, चंद्रभान चौधरी दत्तात्रेय ढाकणे आदींच्या हस्ते रॅलीला सुरु वात करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये ४५ महिला तसेच ३७ पुरु षांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.
सदर शिबिरासाठी बिर्ला आय हॉस्पिटल येथील परमानंद गायकवाड, कविता थोरात, अनुजा दरेकर, स्नेहा गवळणे, सुवर्णा पाटील यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली.
शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य सुनील उगले, अनिल अहिरे, पंकजा अहिरे, संतोष चारोस्कर, विनोद बेंडकुळे, तुकाराम भवर, नाना चव्हाण, ज्ञानेश्वर मातेरे, संतोष बोरस्ते, भारत गायकवाड, रोहिदास गांगोडे, केशव गावित, द्रौपदा गांगोडे, योगिता भोये, अश्विनी भोये आदींनी परिश्रम घेतले.