आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 06:09 PM2020-08-09T18:09:51+5:302020-08-09T18:11:59+5:30
सायखेडा : पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी तसेच स्टाफने सहभाग घेतला होता.

के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच सेंटर आॅफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत स्पर्धकांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवून येणाऱ्या गणेश महोत्सवात पर्यावरण संरक्षण करण्यासाठीचा संदेश दिला.
या आॅनलाईन कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.रवींद्र राऊत आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भावना पौळ यांनी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. किरण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी उषा गायकर, निकिता मत्सागर, डॉ. प्रतिभा बाहेकर, रूचा कापसे, धनश्री गडाख, पुनम थेटे, डॉ. अरु ण ठोके, पंकज वाघचौरे, शरद जाधव,मनोज गायकवाड,अभय होळकर, मनिषा घायाळ, मिलिंद वाघ, अमोल देशमुख, सचिन जाधव, विजय ससाने, धनंजय वाघ आदींनी परिश्रम घेतले.