कृषी संजीवनी सप्ताहास प्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:27 PM2021-07-03T16:27:48+5:302021-07-03T16:28:58+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधन व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.

यात बीबीएफ तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, एक गाव एक वाण व भात यांत्रिकीकरणाद्वारे लागवड, विकेल ते पिकेल, आंबा फळबागा लागवड व तंत्रज्ञान प्रसार, भात व नागली उत्पादकतावाढीसाठी रिसोर्स, भात पिकांच्या महत्त्वाच्या कीड व रोग नियंत्रक उपाययोजनांची माहिती प्रत्येक गावस्तरीय कार्यक्रम व प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेत तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, आनंद कांबळे, अनिल गावीत, मंडल कृषी अधिकारी संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.